भोग तो न घडे संचिताव
2293.
भोग तो न घडे संचितावाचूनि । करावे ते मनी समाधान ॥१॥
म्हणऊनी मनी मानू नये खेदु । म्हणावा गोविंदु वेळोवेळा ॥धृपद॥
आणिका रुसावे न लगे बहुता । आपुल्या संचितावाचूनिया ॥२॥
तुका म्हणे भार घातलिया वरी । होईल कैवारी नारायण ॥३॥
अर्थ :
पूर्व कर्मा मुळेच सुख दुःखादी भोग घडत असतात या विचाराने मन समाधानी करावे. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा खेद माणू नये वेळोवेळी सारखे गोविंद गोविंद असे म्हणत राहावे. आपल्या संचित कर्मा वाचून कोणतेही भोग घडत नाहीत त्यामुळे काहीही झाले तरीही इतरांवर रुसू नये. तुकाराम महाराज म्हणतात जर नारायणा वरच सर्व रक्षणाचा व्यवहाराचा भार घातला तर तोच तुमचा कैवारी होईल. <
