वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नागर गोडे बाळरूप । त

🙏 3. संत तुकाराम · ABH-078277 · अभंग क्र. २२६८

2268.
नागर गोडे बाळरूप । ते स्वरूप काळीचे ॥१॥
गाईगोपाळांच्या संगे । आले लागे पुंडलीका ॥धृपद॥
ते हे ध्यान दिगांबर । कटी कर मिरवती ॥२॥
नेणपणे उगे चि उभे । भक्तीलोभे राहिले ॥३॥
नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभे ॥४॥
सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥५॥
मोहरी पावा गांजिवा पाठी । धरिली काठी ज्या काळे ॥६॥
रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥७॥
भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर ॥८॥
तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥९॥
तुका म्हणे वैकुंठवासी । भक्तंपासी राहिला ॥१०॥

अर्थ :
या विठ्ठलाचे बाळ रूप हे अतिशय गोंडस आहे. विठ्ठलाचे म्हणजे श्री कृष्णाचे लहानपणीचे सावळे रूप आता पुंडलिका करता गाई गोपाळ गौवळण संगेच पंढरीला आले आहे. ते ध्यान दिगंबर स्वरूप आहे आणि कटेवर कर ठेवून अतिशय शोभत आहे. अज्ञानपणा घेऊन उगाचच कटेवर कर ठेवून भक्तांच्या लोभाकरता ते उभे राहिलेले आहेत. त्याला मान सन्मानाची अपेक्षा नाही व ते तो जाणत ही नाही तो केवळ विटेवर त्याचे समचरण ठेवून उभा आहे. त्याचे हात कटेवर आहे व हातात दहीभाताची शिदोरी आहे, ज्याच्या हातात बासरी, पावा, शिदोरी आहे आणि ती पाठीवर टाकलेली आहे आणि त्या काळी त्याने गाईचे रक्षण करण्यासाठी काठीही हातात धरली आहे. असा पांडुरंग, आता क्रीडा करण्यासाठी याने चंद्रभागेचे रम्य स्थळ निवडले आहे. भीमा दक्षिण मुख होऊन वाहते आहे आणि तो पांडुरंग आपली दृष्टी समोर ठेऊन पाहतो आहे. अज्ञानी लोकांचा उद्धार देखील करील असे वचन पुंडलिकाला त्यांने दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा पांडुरंग वैकुंठवासी आहे परंतु भक्त पुंडलिकासाठी त्

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग