वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 252. भूपाळ्या

उठा जागे व्हारे आता

🙏 4. संत नामदेव · ABH-083984 · अभंग क्र. २२७३

2273.
उठा जागे व्हारे आता | स्मरण करा पंढरिनाथा |
भावे चरणी ठेवा माथा | चुकवा व्यथा जन्माच्या ॥१॥
धन दारा पुत्रजन | बंधू सोयरे पिशुन |
सर्वे मिथ्या हे जाणून | शरण रिघा देवासी ॥२॥
मायाविघ्ने भ्रमला खरे | म्हणता मी मायेनि घरे |
हे तो संपत्तीचे वारे | साचोकारे जाईल ॥३॥
आयुष्य जाते आहे पहा | काळ जपतसे महा |
स्वहिताचा घोर वहा | ध्यानी रहा श्रीहरीच्या ॥४॥
संत चरणी भाव धरा | क्षणक्षणा नाम स्मरा |
मुक्ति सायोज्यता वरा | हेंचि करा बापांनो ॥५॥
विष्णुदास विनवी नामा | भुलू नका भवकामा |
धरा अंतरी निज प्रेमा | न चुका नेमा हरिभक्ती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग