वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ब्रह्माज्ञानासाठीं व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086223 · अभंग क्र. २२७९

2279.
ब्रह्माज्ञानासाठीं वेदशास्त्र पुराण । करिता श्रवण नातुडेची ॥१॥
नातुडेची कदा गीताभागवतीं । वाचिता हो पोथी जन्मवरी ॥२॥
द्वरकापट्टण क्षेत्र वाराणसी । करिता तीर्थाटनासी प्राप्त नोहे ॥३॥
प्राप्त नोहे गुरु मंत्रतंत्र घेता । शब्दज्ञानाथितां प्राप्त नोहे ॥४॥
ज्यासी पुनरावृत्ति स्थिर नोहे बोध । अखंडित भेद मनामाजीं ॥५॥
ज्याचे जन्मांतर सरूनियां जाये । तेथे स्थिर होय गुरुबोध ॥६॥
एका जनार्दनी ऐसा जो का पुरुष । कोटीमाजीं एक ब्रह्माज्ञानीं ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग