लाभ खरा नये तुटी । न
2299.
लाभ खरा नये तुटी । नाही आडखळा भेटी ॥१॥
जाय अवघिया देशा । येथे संचलाची तैसा ॥धृपद॥
मग न लगे पारखी । अवघी सकट सारखी । तुका म्हणे वोळे । रूपे भुलविले डोळे ॥३॥
अर्थ :
पंढरीला जर गेले तर कोणत्याही प्रकारचे नुसकान होत नाही उलट मोक्षाचा लाभ होतो आणि देवाची भेट होण्यास कोणताही अडथळा येत नाही. मग तु कोणत्याही देशाला जा, तु जेथे जाशील तेथे सर्वत्र पांडुरंगच संचारून भरलेला आहे असाच तुला अनुभव येईल. मग तुला काय चांगले किंवा काय वाईट याची पारक करण्याची देखील गरज पडणार नाही कारण तुला सरसकट सर्व काही देवासारखेच दिसेल. तुकाराम महाराज म्हणतात हरीचे स्वरूपच सगळीकडे प्रकट झाले असून त्याने डोळ्याला मोहित केले आहे भूलविले आहे त्यामुळे त्याला शरण जावे.
