सोहं नव्हे प्रपंच ज्
2302.
सोहं नव्हे प्रपंच ज्ञान । अंतःकरण चतुष्टय योजन । इंद्रियांचे वर्तन । नव्हे सोहं ॥१॥
सोहं नव्हे विषयपंचक । सोहं नव्हे त्रैशोधक । सोहमाचा विवेक । विरळाचि जाणे ॥२॥
सकार जाण माया । हंकार पुरुष शिष्यमय । शबक शुद्ध इये । जाणावें पै गा ॥३॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा शबल पै सकार । शुद्ध तो हंकार । ईश्वर पै ॥४॥
स्थुल सूक्ष्म कारण । हा सकारचि जाण । हंकार तो महाकारण । ज्ञानरुप ॥५॥
एक जनार्दनी तूर्या । सोहं ते दैवी माया । साक्षित्वे जाण असे श्रोतिया । सांगितले ॥६॥
