वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 75. श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५

उतरावया धरा भार । धर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087753 · अभंग क्र. २२७५

2275.
उतरावया धरा भार । धरी अवतार कृपाळूं ॥१॥
पाळीतसे भक्तलळा । नोहे वेगळा वेगळीक ॥२॥
जया आवडे जे कांही । देता न म्हणे थोडे कांही ॥३॥
पुरवी इच्छा जैसी आहे । मच्छ कच्छ तयासाठीं होय ॥४॥
ऐसा कृपेचा कोंवळा । एका जनार्दनी पाहुं डोळा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग