बुद्धिहीना जडजीवा ।
2301.
बुद्धिहीना जडजीवा । नको देवा उपेक्षू ॥१॥
परिसावी हे विज्ञापना । आम्हा दीना दासांची ॥धृपद॥
चिंतूनिया आले पाय । त्यासी काय वंचना ॥२॥
तुका म्हणे पुरुषोत्तमा । करी क्षमा अपराध ॥३॥
अर्थ :
देवा बुद्धीहीन जड जीवांची तू उपेक्षा करू नकोस. एवढे अम्हा दिन दासाची विनंती देवा कृपया करून ऐका. जे फक्त तुझ्या पायाचे चिंतन करत करत तुझ्याजवळ सेवेसाठी आलेत त्यांची उपेक्षा करणे म्हणजे त्यांची वंचना केल्यासारखेच नाही काय? तुकाराम महाराज म्हणतात हे पुरुषोत्तमा तुला शरण आलेल्या, तुझ्या जवळ आलेल्या भक्तांचे काही आपराध झाले असेल तर ते क्षमा करा.
