अष्टांग साधन धूम्रपा
2277.
अष्टांग साधन धूम्रपाण अटी । ब्रह्माज्ञानासाठीं करिताती ॥१॥
परि ते न लभे न लभे सर्वथा । वाउग्याची कथा बोलताती ॥२॥
शाब्दिकाचा शब्द कुंठित ते ठायी । वाउगें कांही बाही बोलु नये ॥३॥
एका जनार्दनी संतकृपा होता । ब्रह्माज्ञान तत्त्वता घर रिघे ॥४॥
