वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 252. भूपाळ्या

उठा उठा साधुसंत | सा

🙏 4. संत नामदेव · ABH-083983 · अभंग क्र. २२७४

2274.
उठा उठा साधुसंत | साधा आपुले हित |
गेला गेला हा नरदेह | मग केंचा भगवंत ॥ ध्रु ॥
उठूनि वेगेशी | चला जाऊ राउळासी |
जळती पातकांच्या राशी | काकडआरती देखिलिया ॥१॥
उठोनिया पहांटे | विठ्ठल पहा उभा विटे |
चरण तयाचे गोमटे | अमृतदृष्टि अवलोका ॥२॥
जागे करा रुक्मिणीवरा | देव आहे निदसुरा |
वेगे लिंबलोण करा | दृष्ट होईल तयासी ॥३॥
पुढे वाजंत्रे वाजती | ढोल दमामे गर्जती |
होते काकडआरती | पांडुरंगरायाची ॥४॥
सिहनाद शंख भेरी | गजर होतो महाद्वारी |
केशवराज विटेवरी | नामा चरण वंदितो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग