अनुतापाविण । नोहे कद
2284.
अनुतापाविण । नोहे कदा ब्रह्मज्ञान ॥१॥
हे तो मागील रहाटी । अनुताप घ्यावा पोटी ॥२॥
अनुतापावांचुन । कवण तरलासे जाण ॥३॥
अनुताप नाही पोटी । वाया बोलु नयें गाठीं ॥४॥
अनुताप वांचुन जाण । नाही नाही ब्रह्माज्ञान ॥५॥
एका जनार्दनी अनुताप । होता निवारे त्रिविधताप ॥६॥
