सांगती ते ज्ञान तैसे
2667.
सांगती ते ज्ञान तैसे । श्वान सूकरा सरिसें ॥१॥
अंगी नसोनि वर्म । दाविताती गुणकर्म ॥२॥
द्वैताची दावणी वाढ । भुलविती रांडानाड ॥३॥
अभागी ते पामर । नर्क भोगिती अघोर ॥४॥
सांगती पुराणकथा । उभे बाजारीं सर्वथा ॥५॥
एक जनार्दनी नाही भाव । तेथे कैंचा उभा देव ॥६॥
