तोंडभरी विवेक मनी वा
2694.
तोंडभरी विवेक मनी वाहे अभिलाख । विवेक केला रंक विषयाचा ॥१॥
वैराग्याविण ज्ञान बोलती ते उणें । घरोघरी पोसणे लाविताती ॥२॥
जुनाट परिपाठी सांगताहे गोष्टी । विरक्तिविण पोटी ज्ञान नेघे ॥३॥
परिसोनी ग्रंथ निरोप ज्ञानकथा । मनी वाहे आस्था विषयांची ॥४॥
आरंभींच डाव पडियेला खोटा । पचलें नाही पोटा रामनाम ॥५॥
धडधडीत वैराग्य वरी वाहे विवेक । ज्ञानासी तो एक अधिकारी ॥६॥
वैराग्य विवेक बाणलेंसें अंगी । ज्ञान तयालागीं वोसरलें ॥७॥
एका जनादनीं विवेकेशीं भेटी । वैराग्याविण गोष्टी फोल होय ॥८॥
