वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

ऐसे ठावे नाही मूढा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077247 · अभंग क्र. २६७३

2673.
ऐसे ठावे नाही मूढा । सोस काकुलती पुढा ॥१॥
माझी नका जाळू भांडी । पोटी भय सोस तोंडी ॥धृपद॥
पातलिया काळ । तेव्हा काय चाले बळ ॥२॥
संचित ते करी । नरका जाया मेल्यावरी ॥३॥
परउपकार । न घडावा हा विचार ॥४॥
तुका म्हणे लांसी । आता भेटो नये ऐसी ॥५॥

अर्थ :
एखादया मनुष्याच्या घरी कोणी काही मागावयास गेले तर तो त्याला काकूळतीला येऊन म्हणतो ही माझी वस्तू आहे तुम्ही नेऊ नका. एखादया मनुष्याच्या घरी जर काही कार्यक्रम असला व तो स्वयंपाक करण्यासाठी एखादया व्यक्तीकडे भांडी मागण्यासाठी गेला तर तो मनुष्य त्या व्यक्तीला म्हणतो की माझे भांडे तुम्ही नेऊ नका व ते जाळू नका कारण त्या माणसाला मिथ्या गोष्टीविषयी हाव असते आणि ती वस्तू नष्ट होईल की काय याचे भय वाटते त्यामुळे तो मनुष्य काहीही बोलत असतो. परंतू अशा व्यक्तीच्या जर पुढे काळच येऊन उभा राहिला तर त्यावेळी काळापुढे त्याचे काय बळ चालणार आहे ? तो मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हरीचे नाम घेत नाही केवळ धनाचा हव्यास करत राहतो आणि मेल्यावर मात्र नरकाला जातो. आपल्या हातून कधीही परोपकार घडू नये हाच विचार त्याच्या मनात नेहमी असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशी राक्षस वृत्ती असणारी माणसे कधीही भेटू नयेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग