पोट भरावया भांड । जै
2687.
पोट भरावया भांड । जैसा बडबडी तोंड ॥१॥
तेवीं विषयालागी जाण । शास्त्र व्युत्पत्ती श्रवण ॥२॥
विषयवासना धरुनी थोर । दावी वरवर आचार ॥३॥
जेवी काग विष्ठा देखे । तेंवी विषय देखोनि पोखे ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एक । सुटिका नोहे तया देखा ॥५॥
