आवडी का ठेवू । बैसोन
2692.
आवडी का ठेवू । बैसोनिया संगे जेवू ॥१॥
मागे नको ठेवू उरी । माझी आण तुजवरी ॥धृपद॥
देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥२॥
तुका म्हणे बाळी । केली चाहाडी सकळी ॥३॥
अर्थ :
देवा तू आणि मी एकत्र बसून जेवु आता एवढी तरी आवड बाकी का ठेवावी ? देवा माझी कोणत्याही प्रकारची इच्छा तू मागे उरु देऊ नकोस ही तुला माझी शपथ आहे. देवा तू भक्तांबरोबर कसा आवडीने जेवतोस त्यांच्याबरोबर राहतोस हे मी फक्त नामदेवरायांच्या प्रकारावरुन चांगले अनुभवले आहे पाहिले आहे आणि तोच प्रकार मी माझ्याबाबतीतही पूर्ण होताना पाहणारच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू काल्याच्या प्रसंगी गोपाळांचे उष्टे सेवन केले आहे याबद्दल तुझी चहाडी गोपाळांनी माझ्याजवळ केली आहे.
