वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आहे ते सकळ प्रारब्धा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077045 · अभंग क्र. २६८८

2688.
आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती । यावे काकुलती यासी आता ॥१॥
ऐसा माझ्या मने सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाही ॥धृपद॥
अवघियांची जेव्हा सारावी करकर । भावबळे थार धरू येसी ॥२॥
तुका म्हणे तुज ठेवावे पुजून । आणीक तो गुण नाही येथे ॥३॥

अर्थ :
सर्व काही प्रारब्धाच्या हातात आहे म्हणूनच या देवाने आता काकूळतीला यावे. असा उपाय माझ्या मनाने मला सांगितला आहे व असे केले तरच देव आपल्यापेक्षा वेगळा होणार नाही. देवा ज्यावेळी आम्ही सर्व प्रपंचाची कटकट बाजूला सारु त्यावेळीच तुझ्याजवळ आम्ही भक्तीभावाने आश्रय धरु. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी प्राप्ती करुन घेण्यासाठी तुला पूजावे लागेल तुझी भक्ती करावी लागेल येथे यावाचून दुसरा कोणताही उपाय चालणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग