कथेकरी - अभंग २६७७ त
2677.
कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८
आहारालागीं कथा । करिताती पै सर्वथा ॥१॥
आहार न मिळतां जाण । कथेलागीं पुसे कोण ॥२॥
आहार मिळतां पोट भरी । पुराण सांगे बरव्या परी ॥३॥
आहार मिळतां संध्यास्नान । आहारार्थ जपध्यान ॥४॥
आहारालागीं उपासना । नीचसेवना आहारेंची ॥५॥
आहाराकारणें सर्व हेत । एका जनार्दनी गात आहारेंची ॥६॥
