नव्हेसी तू लांसी । म
2693.
नव्हेसी तू लांसी । माया आणिका त्या ऐसी ॥१॥
जे हे वाया जाती बोल । होती निर्फळचि फोल ॥धृपद॥
नव्हेसी दुबळी । काही नाही ते जवळी ॥२॥
तुका म्हणे खोटी । काही नव्हेसी करंटी ॥३॥
अर्थ :
हे पाडूरंगे आई तू इतरांसारखी क्रुर राक्षसीण आई नाहीस. मी बोललेले कोणतेही शब्द वाया जाणार नाही आणि ते व्यर्थ व निष्फळही ठरणार नाहीत. तू दुबळी नाही आणि तुझ्याजवळ काय नाही ? तुकाराम महाराज म्हणतात, तू खोटी किंवा करंटी ही नाहीस.
