वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

पावतो ताडन । जरी हे

🙏 3. संत तुकाराम · ABH-076962 · अभंग क्र. २६६५

2665.
पावतो ताडन । जरी हे मोकलिते जन ॥१॥
मग मी आठवितो दुःखे । देवा सावकाश मुखे ॥धृपद॥
होती अप्रतिष्ठा । होतो वरपडा कष्टा ॥२॥
तुका म्हणे मान । होता उत्तम खंडन ॥३॥

अर्थ :
जर माझा लोकांनी त्याग केला तर मला चांगली शिक्षा मिळाली असे मी म्हणेन. जर मला असे दु:ख झाले तर मी मग देवाला सावकाशपणे आठवेन व मुखाने त्याचे नाम घेईन. जर लोकांमध्ये माझी अप्रतिष्ठा झाली आणि त्यामुळे मला कष्ट होऊन दु:ख झाले तर मला ते चांगलेच होईल. तुकाराम महाराज म्हणतात, माझा लोकांमध्ये अपमान झाला, माझा मानसन्मान होणे खंडीत झाले तर हे फारच उत्तम होईल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग