वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

सेवट तो होती तुझियान

🙏 3. संत तुकाराम · ABH-077428 · अभंग क्र. २६८९

2689.
सेवट तो होती तुझियाने गोड । म्हणऊनि चाड धरीतसो ॥१॥
देऊ भोगाभोग कलिवरचा भार । साहो तुज भार त्याचमधी ॥धृपद॥
तुझ्या बळे काही खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥
तुका म्हणे आम्ही चेंपलो या भारे । तुमचे ते खरे देवपण ॥३॥

अर्थ :
देवा तू जर साहाय्य केले तर कोणत्याही कार्‍याचा शेवट गोड होतो म्हणून तर मी तुझ्याविषयी आवड धरीत आहे. देवा देहाविषयीचे कोणतेही भोग उपभोग असो ते सर्व आम्ही तुला समर्पण करु आणि आमच्या देहामध्ये तुला थारा देऊ. देवा तुझे फळ आमच्या पाठीमागे आहे त्यामुळे आम्हाला प्रपंचातील कसल्याही प्रकारची खटपट काम वाढविण्याची व कष्ट करण्याची गरज लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही प्रपंचाच्या भाराने शेकलो गेलेलो आहोत परंतू तुम्ही सुखदु:खाच्या पलीकडचे आहात त्यामुळे तुमचे देवपणच खरे आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग