वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता दोघामध्ये काय ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077049 · अभंग क्र. २६९८

2698.
आता दोघामध्ये काय । उरले होय वाणीजेसे ॥१॥
निष्ठुर हे केले मन । समाधान न करूनि ॥धृपद॥
झुरावे ते तेथींच्या परी । घरिच्याघरी अवघिया ॥२॥
तुका म्हणे देवपण । गुंडाळून असो दे ॥३॥

अर्थ :
देवा आता तुमच्यात आणि आमच्यात वर्णन करुन सांगण्यासारखे काय उरले आहे ? देवा तुम्ही माझे समाधान करुन माझे मन निष्ठूर केले आहे. देवा तुझ्यासाठी आम्ही घरच्या घरीच झुरत बसावे एवढेच आता बाकी राहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुझे देवपण तू गुंडाळून टाक. (या अभंगामध्ये महाराज नीजस्वरुपच स्थितीत असताना देवाशी विरोधी भासाने बोलतात. )

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग