आम्हासी संगाती । होत
2668.
आम्हासी संगाती । होती अराले ते होती ॥१॥
येती आइकता हाक । दोन्ही मिळोन म्हणती एक ॥धृपद॥
आणिक उत्तरी । नसे गोवीली वैखरी ॥२॥
तुका म्हणे बोला । खूण पहाती विठ्ठला ॥३॥
अर्थ :
जे आमच्याकडे येण्यासाठी नेहमी उत्सुक असतात तेच खरे आमचे मित्र आहेत. आम्ही हाक मारली की ते लगेच आमच्याकडे येतात आणि आम्ही एकत्र आलो की ते म्हणतात की, आम्ही दोघेही एकच आहोत. आणि त्यांची वाणी हरीनामावाचून इतर कशातही गुंतलेली नसते. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक बोलामध्ये ते विठ्ठलाचीच खूण पाहात असतात.
