वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

माझे तो स्वभाव मज अन

🙏 3. संत तुकाराम · ABH-077086 · अभंग क्र. २६७९

2679.
माझे तो स्वभाव मज अनावर । तुज ही देता भार काही नव्हे ॥१॥
ऐसे कळो आले मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाही ॥धृपद॥
संपादितो तो अवघा बाह्य रंग । तुझा नाही संग अभ्यंतरी ॥२॥
तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट । असते निघोंट एकी जाती ॥३॥

अर्थ :
देवा माझा स्वभाव मला अनावर झाला आहे आणि त्यामुळेच मी माझा भार तुझ्यावर घातला तर तुही काही मदत करीत नाहीस. हे नारायणा माझ्या जागृतीत आणि स्वप्नात ताळमेळच नाही हे मला कळून आले आहे. हे नारायणा मी बाहयरंगाने तुझा भक्त आहे असे सोंग केवळ संपादन करीत आहे परंतू माझ्या अंत:करणात पाहिले तर तुझी सोबतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सत्याला दोन बाजू नसतात पाठ नसते आणि पोट नसते सत्य हे परिपूर्ण असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग