व्हावया भिकारी हेचि
2671.
व्हावया भिकारी हेचि आम्हा कारण । अंतरोनि जन व्हावे दुरी ॥१॥
संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥
तुका म्हणे दुःखे उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकी देवा ॥३॥
अर्थ :
आम्ही भिकारी होण्याचे कारण एकच आहे व असे केल्यानेच लोक आमच्यापासून दूर जातील. माझा या प्रपंचाशी पूर्णपणे संबंध तुटावा एवढेच काय कोणाच्या शब्दाचा देखील स्पर्श मला होऊ नये त्यामुळेच तर मी संसाराची पूर्ण इच्छाच टाकून दिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या प्रपंचाच्या दु:खाने तर माझा जीव खूप उबगला आहे त्यामुळेच तर मी तुला कीव भाकीत आहे.
