हरिकथा परिसोनि जरी द
2705.
हरिकथा परिसोनि जरी देखसी दोष । भुजंगा तेंचि परतले विष ॥१॥
हरिनाम ऐकता जरी न वाटे सुख । अंतरी तुं देख पाप आहे ॥२॥
कस्तुरीचे आळां पेरिला पलांडु । सुवास लोपोनि कैसा वाडे दुर्गधु ॥३॥
धारोष्णा पय परी ज्वरितांचें मुख । थुंकोनि सांडी म्हणे कडु वीख ॥४॥
पान लागलिया गूळ न म्हणे गोडु । गोडाचे गोड ते झाले कडु ॥५॥
एका जनार्दनी भाव नुपजे नरा । नरदेही आयुष्य तेंही केला मातेरा ॥६॥
