गुरु - अभंग २६६१ ते
2661.
गुरु - अभंग २६६१ ते २६६५
आहाच वाहाच झकविलें लोका 2661
आहाच वाहाच झकविलें लोका । ऐसिया ठका देव कैचा ॥१॥
शिकवूनी जन वंचला आपण । नरकी पतन होत असे ॥२॥
मी ज्ञाता म्हणुनी फुगोनी बैसला । ब्रह्माविद्येचा पसारा घातिला ॥३॥
अभ्यासी ते मिरवी लोकी । पडलीया चुकी निजपंथे ॥४॥
ज्यासी दंभ तो काय नेणे । लोकी मानवणे हेंची पाहे ॥५॥
घरोघरी गुरु आहेत आईते । गूळ घेऊनिया विकिती रायते ॥६॥
संसारापासोनी सोडवी साचे । सदगुरु ऐसे नांव त्याचे ॥७॥
बोलाचेनि ज्ञाने पावोनि देवा । भुलविले भावा अभिमानें ॥८॥
एका जनार्दनी नव्हे त्या भेटी । वोसणतां भेटी साच होय ॥९॥
