वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आपुलिये ठाकी । करीन

🙏 3. संत तुकाराम · ABH-077008 · अभंग क्र. २६७८

2678.
आपुलिये ठाकी । करीन काही तरी एकी ॥१॥
करीन पायासी वोळखी । करिसी ते करी सुखी ॥धृपद॥
कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥२॥
तुका म्हणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥३॥

अर्थ :
देवा मला जमेल तसे माझ्या बळाप्रमाणे मी काहीतरी करीन. मी तुझ्या पायाशी ओळख करुन घेईन मग तुला सुखाने काय करायचे असेल ते कर. देवा मी माझ्या शरीराला कष्ट देऊन तुझी सेवा करीन आणि तुला गंगाजळ तसेच तुळशीपत्र सर्मपण करीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जर मला हे काहीही जमले नाही तर मी माझे दोन्हीही कर जोडून तुझी सेवा करीन.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग