असत्य जन्मले असत्याच
2662.
असत्य जन्मले असत्याचे पोटी । अर्थबळे चावटीं शिकविती ॥१॥
अर्थीं धरूनी आस असत्य बोलणें । अर्थासाठीं घेणे मंत्रयंत्र ॥२॥
अर्थासाठीं प्राण त्यजिती जनीं । अर्थे होत हानी प्राणिमात्रा ॥३॥
एका जनार्दनी अर्थाचा संबंध । तेथे भेदाभेद सहज उठे ॥४॥
