पायापासी चित्त । तेण
2683.
पायापासी चित्त । तेणे भेटी अखंडित ॥१॥
असे खेळे भलते ठायी । प्रेमसूत्रदोरी पायी ॥धृपद॥
केलेसे जतन । मुळी काय ते वचन ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा । ठायी विचारावे मना ॥३॥
अर्थ :
देवाच्या पायाशी माझे चित्त अखंडीत आहे त्यामुळे माझी देवाशी सारखी भेट होत आहे. मी कोठेही खेळत असलो तरी प्रेमसूत्र दोरी तुझ्या पायाशीच आहे. देवा तू अर्जुनाशी जो काही संवाद केला आहे ते सर्व तुझे शब्द मी जतन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्वज्ञ पाडूरंगा आपल्या दोघामध्ये जो काही करार झाला आहे याचा विचार तू आपल्या मनाशीच कर.
