वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

देह प्रारब्धा शिरी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-076996 · अभंग क्र. २७०७

2707.
देह प्रारब्धा शिरी । असोनि करी उद्वेग ॥१॥
धाव घाली नारायणा । माझ्या मना जागवी ॥धृपद॥
ऐसी चुकोनिया वर्मे । पीडा भ्रमे पावलो ॥२॥
तुका म्हणे कैचा भोग । नव्हे रोग अंगींचा ॥३॥

अर्थ :
देह प्रारब्धाच्या माथ्यावर आहे हे माहित असताना देखील मी निष्कारण उव्देग करीत आहे. त्यामुळे हे नारायणा तू धाव घाल आणि माझ्या मनाला याविषयी मला जागृत कर. अहो सुख दु:ख हे तर प्रारब्धाच्या माथ्यावर आहे हेच खरे वर्म मी विसरलो त्यामुळे मी नसत्या भ्रमाने मी पिडीत झालो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे शरीराला होणारे भोग हे एक प्रकारचे रोग नाहीत काय ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग