वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आम्ही म्हणो कोणी नाह

🙏 3. संत तुकाराम · ABH-077140 · अभंग क्र. २६८७

2687.
आम्ही म्हणो कोणी नाही तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥
हागे माझ्या भोगे केलासी परता । विश्वंभरी सत्ता नाही ऐसी ॥धृपद॥
आम्ही तुज असो देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितो ॥२॥
तुका म्हणे मज धरियेले काळे । पंचभूती खळे करूनिया ॥३॥

अर्थ :
हे पाडूरंगा तुझे कोणतेही काम असले ते तू करताना तुला कुणी आडवे येऊ शकत नाही कारण तू सर्व समर्थ आहे असेच आम्ही आतापर्यंत म्हणत आलो आहे परंतू तू तर भित्रा दिसतो आहेस. हे पाडूरंगा तुला माझ्या प्रारब्धानेच मागे सारले आहे तुझे नांव जरी विश्वंभर असले तरी ती सत्ता आता तुझ्या हातात राहीली नाही असेच दिसते. देवा अरे आम्हीच तुला आधार देत आहोत आणि तुझे नाम वारंवार उच्चारीत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला पंचभूतांनी वेढा घातला असून त्यांनी मला काळाच्या हवाली केले आहे तरी तू तुझे शौर्य दाखवून मला यातून कृपा करुन सोडव.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग