वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

मरोनिया गेली माया ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077076 · अभंग क्र. २६९५

2695.
मरोनिया गेली माया । मग तया कोण पुसे ॥१॥
पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥धृपद॥
निढळासी निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥२॥
तुका म्हणे देवाऐसी । आहो सरसी आपण ॥३॥

अर्थ :
ज्याची आई मेली त्याला कोण विचारतेय ? त्या पोरक्या मुलाला कोण विचारील अहो ही तर जगाची रीतच आहे. पण जर चांगला मुलगा व चांगली आई असा जोडा असेल तरच त्या मुलाचे कोड कौतुक होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवही चांगला आहे व त्या देवाप्रमाणे आम्हीही चांगले आहोत मग आम्हाला येथे काय कमी पडणार आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग