बाजारीं बैसोनि सांगे
2683.
बाजारीं बैसोनि सांगे ज्ञान गोष्टी । कथेचि राहाटी वोपावोपी ॥१॥
मेळवोनी जन सांगे निरूपण । वाचे ब्रह्मज्ञान पोटासाठीं ॥२॥
न कळे पामरा आपुला विचार । करी अनाचार जगामध्ये ॥३॥
एका जनार्दनी ऐसे फजीतखोर । भोगिती अघोर नरक देखा ॥४॥
