थोडे तुम्ही मागे होत
2686.
थोडे तुम्ही मागे होते उद्धरिले । मज ऐसे गेले वाया जीव ॥१॥
आता याचा काही न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तू ॥धृपद॥
तुज आळविता पापाची वसति । राहे अंगी किती बळ त्याचे ॥२॥
तुका म्हणे जैसे तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥
अर्थ :
देवा मागे तुम्ही माझ्यासारखे वाया गेलेले कितीतरी भक्तांचा उध्दार केला ते थोडे आहेत काय ? तू आता याचा काहीही भार मानून घेऊ नयेस तू कृपेचा सागर आहेस. देवा तुला आळवल्यानंतर माझ्या अंत:करणात पाप तरी राहील काय कारण तुझ्या बाळापुढे त्याचे बळ तरी कितीसे आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही राम अवतारामधे कितीतरी जड दगड तारले आहेत त्या दगडांपैकीच मी ही एक आहे असे समजा व माझा उध्दार करा.
