वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 102. संत - अभंग २६७१ ते २६७२

संत - अभंग २६७१ ते २

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084512 · अभंग क्र. २६७१

2671.
संत - अभंग २६७१ ते २६७२

कलीमाजें संत जाले । टिळा टोपी लाविती भले ॥१॥
नाही वर्माचे साधन । न कळे हृदयी आत्मज्ञान ॥२॥
सदा सर्वदा गुरगुरी । द्वेष सर्वदा ते करी ॥३॥
भजनीं नाही चाड । सदा विषयी कबाड ॥४॥
ऐसिया संतांचा सांगात । नको मजसी आदिअंत ॥५॥
भोळियाच्या पायी । एका जनार्दनी ठाव देई ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग