मागितल्यास आस करा ।
2699.
मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाही ॥१॥
म्हणऊनि सारिली आस । होती यास मूळ ते ॥धृपद॥
माझ्या मोहे तुज पान्हा । लोटे स्तना वोरसे ॥२॥
तुका म्हणे आळवणे । माझ्या देणे उत्तरा ॥३॥
अर्थ :
देवा तुम्हाला काहीतरी मागितले तर तुम्ही मागे काहीतरी राहू देताच. त्यामुळेच देवा मी माझी आवड टाकून दिली टाकून देण्याचे मूळ कारण हेच होते. देवा मला माहित आहे माझ्या मोहाने तुझ्या स्तनाला प्रेमरुपी पान्हा लोटतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुला प्रेमाने आळवित आहे त्या निमित्ताने तरी तू माझ्याशी बोलशील.
