वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

एक वेळ केले रिते कले

🙏 3. संत तुकाराम · ABH-077353 · अभंग क्र. २६६४

2664.
एक वेळ केले रिते कलेवर । आता दिली थार पांडुरंगा ॥१॥
पाळण पोषण नलगे ते सोई । देहाचे ते काई सर्वभावे ॥धृपद॥
माझिया मरणे झाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाश ॥२॥
झाला ऐसा एका घाये येथे नाही । तुका म्हणे काही बोलो नये ॥३॥

अर्थ :
मी एकदाचे माझ्या देहातून सर्व विकार बाहेर काढून दिले आहे आणि तेथे पाडूरंगालाच थारा दिला आहे. यामुळेच देहाचे पालनपोषण आणि देहाचे सर्व चोचले पुरवण्याची गरजच राहिली नाही. आता माझा देहभाव नाहीसा झाला त्यामुळे माझ्या अंत:करणात अविनाश अशा पाडूरंगाचीच ज्योत लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अविनाशी पाडूरंगाची माझ्या अंत:करणात ज्योत पेटली त्यामुळे माझ्या देहाभिमानाचा एका घावातच नाश झाला त्यामुळे मला कोणीही विशेष नावाने किंवा पदवीने संबोधू नये.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग