वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

कैचे भांडवल खरा हाती

🙏 3. संत तुकाराम · ABH-077408 · अभंग क्र. २६८५

2685.
कैचे भांडवल खरा हाती भाव । कळवळ्याने भाव दावीतसे ॥१॥
आता माझा अंत नको सर्वजाणा । पाहो नारायणा निवडूनि ॥धृपद॥
संतांचे उच्छिष्ट मागितले पंगती । करावे संगती लागे ऐसे ॥२॥
तुका म्हणे आलो दावूनि विश्वास । संचित ते नास पावे ऐसे ॥३॥

अर्थ :
देवा माझ्या हातात कसले श्रध्देचे आणि तुझ्याविषयी खर्‍या भक्तीभाव भांडवल आहे मी केवळ कळवळयाने तुझी भक्ती करण्याचे आव जगाला दाखवित आहे. हे नारायणा सर्व जाणत्या तुला सर्वच माहित आहे मी हे ढोंग करतो आहे हे तुझ्या जरी लक्षात आले तरी तू माझा अव्हेर करु नकोस आणि माझा अंत पाहू नकोस. हे नारायणा संतांचे उच्चिष्ट राहिलेले भोजन मी मागच्या पंगतीत बसून सेवन करीन आणि त्यांची संगती मला लाभेल असेच काहीतरी तू कर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी लोकांमध्ये असा विश्वास दाखवून आलो आहे की तुझी भक्ती केल्याने सर्व संचित कर्मे नाश पावतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग