धरावे ते भय । जाती अ
2666.
धरावे ते भय । जाती अंतरोनि पाय ॥१॥
झाल्या तुटी देववास । काय वांचोनि करावे ॥धृपद॥
कोणासी पारिखे । लेखू आपणासारिखे ॥२॥
तुका म्हणे असो । अथवा हे आता नसो ॥३॥
अर्थ :
देवाचे पाय ज्या कारणामुळे अंतरतील त्या कारणाचे भय धरावे. देवापासून आपला वियोग जर झाला तर जगून तरी काय करावे ? देवाला सोडून मी कोणा परक्याला आपलासा म्हणू ? तुकाराम महाराज म्हणतात, काही असो वा नसो मला फक्त देवच पाहिजे.
