वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

बोलणे ते आम्ही बोलो

🙏 3. संत तुकाराम · ABH-077303 · अभंग क्र. २६७५

2675.
बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी । पडिले प्रसंगी काळाऐसे ॥१॥
जयामध्ये देव आदि मध्ये अंती । खोल पाया भिंती न खचेची ॥धृपद॥
करणे ते आम्ही करू एका वेळे । पुढिलिया बळे वाढी खुंटे ॥२॥
तुका म्हणे असो आज्ञेची धारके । म्हणऊनि एके बोले सारू ॥३॥

अर्थ :
कालाच्यानुसार जसा प्रसंग पडेल त्यावेळीच उपयोगी पडणारे बोल आम्ही बोलू. ज्या बोलामध्ये देवाची व्याप्ती सुरवातीला मध्ये आणि शेवटी असते तेच बोल उपयोगी ठरते जसे पाया खोल घेतला म्हणजे भिंत कधीही खचत नाही. आम्ही काहीही करताना असे करु की आमचे पुढे वाढणारे संचित कर्म एकदम खुंटीत होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हरीचे आज्ञाधारक सेवक आहोत त्यामुळे एका बोलातच आम्ही परमार्थाचे सर्व कामे सारु.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग