द्रव्य घेऊनिया उपदेश
2681.
द्रव्य घेऊनिया उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मी ॥१॥
द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मी ॥२॥
द्रव्य देऊनिया दान परतोनि घेती । सूकार ते होती जन्मोजन्मी ॥३॥
द्रव्य घेऊनिया रंगी जे नाचती । वैष्णव ते न होती जन्मोजन्मी ॥४॥
एका जनार्दनी निर्धन भजन । तेथे नारायण संतुष्टची ॥५॥
