वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

करिता हरिकथा श्रवण ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087003 · अभंग क्र. २६९५

2695.
करिता हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच नये दारुण । रुका वेचिता प्राण । जाऊ पाहे ॥१॥
द्रव्यदारा लोभ अंतरी । हरिकथा वरी वरी । बीज अग्नीमाझारीं । विरुढें कैसे ॥२॥
टाळी लावूनिया जाण । दृढ घालिती आसन । अंतरी तो ध्यान । वल्लभेचें ॥३॥
धनलोभाचा वोणवा । तेथे जाळिलें जीवभावा । हरिकथेचा करी हेवा । लोकारुढी ॥४॥
धनलोभी आसक्तता । हरिकथा करी वृथा । तयासी तो परमार्थ तत्त्वता । न घडे जाणा ॥५॥
एकलीच कांता । नाश करी परमार्था । तेथे धनलोभ येता । अनर्थचि होय ॥६॥
एका जनार्दनी । काम क्रोध लोभ तिन्ही । द्रव्यदारा त्यजोनी । नित्य तो मुक्त ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग