अभाविकांचे कर्म । तय
2698.
अभाविकांचे कर्म । तया न कळे कांही वर्म । संता म्हणती भ्रम । यासी झाला ॥१॥
हरुषे मुखे नाम गाय । तया म्हणती वेडा होय अभाविकांचें भय । जन मनी वाहे ॥२॥
बोले जैसा का भाट । वर्म कांही न कळे नीट । नामस्मरण स्पष्ट । न घडे तया ॥३॥
ऐशियाची संगती । न घडावी निश्चिती । एका जनार्दनीक अप्रीति । तयाची देवा ॥४॥
२६९९
वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वता थेंब नाही ॥१॥
वाया तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिविण ॥२॥
अरण्यांत जैशी सुकरे बैसतीं । तैसे मठाप्रती करुनी बैसे ॥३॥
उदय होतांची लपतें उलुक । तैसे तो मूर्ख समाधि बैसे ॥४॥
एका जनार्दनी वाया गेले सर्व । संसार ना देव दोन्ही शून्य ॥५॥
