उद्धत त्या जाती । द्
2702.
उद्धत त्या जाती । द्रवे रंगल्या उद्धती ॥१॥
म्हणऊनि बहु फार । त्यासी असावे अंतर ॥धृपद॥
कैचे पाठी पोट । गोड विषासी सेवट ॥२॥
तुका म्हणे सापा । न कळे कुरवाळिले बापा ॥३॥
अर्थ :
उध्दट जाती कोणत्या आहेत तर ज्याच्याकडे सत्ता संपत्ती द्रव्याचा माज असतो त्याच माणसाची जात उध्दट असते. म्हणूनच त्या मनुष्यापासून आपले फारच दूरवर अंतर असावे. अहो विषाला कसली पाठ आणि पोट विषमय झालेला कोणताही पदार्थ किंवा काहीही असो त्याचा शेवट गोड होतो काय ? तुकाराम महाराज म्हणतात, हे बाबांनो सापाला कधीही कुरवाळू नये तो त्याचा मूळ स्वभाव दंश करण्याचा तो कधीही सोडत नाही त्याप्रमाणे उध्दट जातीच्या माणसाशी कधीही संगती करु नये तो आपल्याला दंशच करीन.
