वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आम्हा बोल लावा । तुम

🙏 3. संत तुकाराम · ABH-077105 · अभंग क्र. २६९४

2694.
आम्हा बोल लावा । तुम्हा अनुचित हे देवा ॥१॥
ऐसे सांगा का व्यालेती । काय नाही तुम्हा हाती ॥धृपद॥
आता धरा दुरी । वाया दवडाया थोरी ॥२॥
तुका म्हणे ठायी । ऐसे विचारावे पायी ॥३॥

अर्थ :
हे देवा तू आमच्यावर दोष ठेवून आम्हाला बोलावे हे योग्य नाही. आम्हाला मग तुम्ही जन्मच का बरे दिला आणि तुमच्या हाती काय नाही ते तुम्ही सांगा. देवा तुम्ही जर आम्हाला तुमच्यापासून दूर धराल तर तुमचा मोठेपणा वाया जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, या गोष्टीचा तुम्ही स्वत:शीस विचार करा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग