वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

सुराणीची झालो लाडिकी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077211 · अभंग क्र. २६६३

2663.
सुराणीची झालो लाडिकी एकली । वडील धाकुली आम्ही देवा ॥१॥
म्हणऊनि काही न घडे अव्हेर । गोमटे उत्तर भातुके ही ॥धृपद॥
काही एक नाही वंचिले वेगळे । मुळिचया मुळे स्थिरावले ॥२॥
लेवविलो अंगी आपली भूषणे । अळंकार लेणे सकळ ही ॥३॥
सारिता न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाही लेखा ॥४॥
तुका म्हणे आम्ही आळवू आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥

अर्थ :
देवा मी तुझे एकुलते एक लाडके लेकरू झालो आहे वडीलही आम्हीच आणि धाकटेही आम्हीच झालो आहोत. त्यामुळेच तर तू आमच्याशी गोड बोलतोस आमचा कधी अव्हेर करत नाही आणि आम्हाला प्रेमाने खाऊ घालतोस. देव आमच्यापासून काहीही एक वेगळे ठेवत नाही आम्हाला कधी तो वंचितही करीत नाही त्यामुळे आमचे चित्त जे मूळ आहे नीजस्वरुप त्या ठिकाणी स्थिर झाले आहे. देवाने त्याचे सर्व अलंकार आभूषणे आमच्या अंगावर घातली आहेत. या देवाच्या पारमार्थिक धनाचे भांडार इतके आहे की ते कितीही खर्च केले तरी खर्च होत नाही ते शिल्लकच राहाते आणि त्याचा अंत:पारही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला आम्ही आवडीने आळवितो व यापुढेही आळवू त्यामुळेच तर देवाने एवढा मोठा लाभ आम्हाला दाखविला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग