वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

माय लेंकरांत भिन्न ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077292 · अभंग क्र. २६९१

2691.
माय लेंकरांत भिन्न । नाही उत्तराचा सीण ॥१॥
धाडी धाडी वो भातुके । रंजविल्याचे कौतुके ॥धृपद॥
करूनि नवल । याचे बोलिलो ते बोल ॥२॥
तुका म्हणे माते । पांडुरंगे कृपावंते ॥३॥

अर्थ :
मायलेकरांमधे जरी बोलण्याबोलण्यात परकेपणा आला तरी त्यांना त्याचा त्रास वाटत नाही. देवा त्याप्रमाणे आपल्या दोघामध्येही मायलेकराचे नाते आहे मी आतापर्यंत तुमच्याशी जे काही गोड बोबडे बोलून तुमचे मनोरंजन केले त्या बदल्यात तुम्ही तुमचे प्रेमरुपी भातूके दयावेत. देवा मी तुमच्याशी जे काही बोललो त्याचे तुम्ही कौतुक करा. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंग कृपावंत माते तू मला तुझ्या भक्तीप्रेमरुपीचा खाऊ दयावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग