वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

चुकलो या ऐशा वर्मा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077117 · अभंग क्र. २७०६

2706.
चुकलो या ऐशा वर्मा । तरी कर्मा सापडलो ॥१॥
पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥धृपद॥
माझे तुझे भिन्नभावे । गळा दावे मोहाचे ॥२॥
तुका म्हणे पाठेळ केलो । नसत्या भ्यालो छंदासी ॥३॥

अर्थ :
सर्व काही हरीला समर्पण करावे हे वर्म मी चुकलो त्यामुळेच मी कर्माच्या अडचणीत सापडलो. आणि आता तेच कर्म माझ्या पाठीशी लागले असून माझा नाश ते करीत आहे व मला गर्भवास भोगायला लावत आहे. माझे तुझे असे भिन्नभाव या कर्माने निर्माण केले आणि मोहाचे दावे गळयाला लावले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या कर्माने मला पाठीवर बैलासारखे केले आहे आणि नसत्या या प्रपंचाच्या छंदाने मी ही भ्यालो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग