वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

निष्ठुर यासाठी करितो

🙏 3. संत तुकाराम · ABH-076968 · अभंग क्र. २६८२

2682.
निष्ठुर यासाठी करितो भाषण । आहेसी सर्वज्ञ जाणता तू ॥१॥
ऐसे कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊ आता शरण त्यासी ॥धृपद॥
बैसलासी केणे करुनिया धीर । नाही येथे उरी दुसऱ्याची ॥२॥
तुका म्हणे आले अवघेच पायापे । आता मायबापे नुपेक्षावे ॥३॥

अर्थ :
देवा मी तुझ्याशी इतका निष्ठूरतेने का बोलतो आहे कारण तू सर्वज्ञ आहेस. देवा तुला माझे सर्व दु:ख माहित आहे अरे मग तुझ्यावाचून येथे दुसरे कोण माझे दु:ख निवारण करीन आणि मी कोणाला शरण जाऊ तेही तूच सांग ? देवा अरे तू माझा उध्दार करण्यासाठी एवढा धीर धरुन का बसला आहेस हे काम तुझ्यावाचून इतर कोणालाही जमणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायबापा आता सर्वकाही तुझ्या पायाजवळच आले आहे आता तू माझी उपेक्षा करु नकोस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग